कराची : पाकिस्तानचा उल्लेख नेहमीच तेजतर्रार बॉलर्स तयार करण्यात आघाडीवर असतो. आता याच भूमीवर एक सात वर्षांचा शोएब अख्तर धावताना आणि आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या देशानं इमरान खान, वसीम अकरम, वकार युनिस, शोएब अख्तर आणि मोहम्मद आमिर यांसारखे तेजतर्रार बॉलर्स दिले... त्याच देशात हा आणखीन एक छोटा करिश्मा पाहायला मिळतोय. 


अहसान उल्लाह असं या सात केवळ वर्षांच्या करिश्म्याचं नाव आहे. तो जेव्हा बॉलिंग करताना दिसतो तेव्हा तुम्हालाही त्यात पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरची प्रतिभा दिसून येईल. म्हणूनच त्याचा उल्लेख छोटा शोएब अख्तर केला जातोय. 


पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमची कॅप्टन सना मीर हिने अहसानचा एक व्हिडिओ शेअर केलाय. '#रॉ टॅलेंट ऑफ पाकिस्तान, अहसान उल्लाह, केवळ सात वर्षांचा, पण त्याच्याकडे चांगलीच बॉलिंग अॅक्शन, प्रतिभा आहे' असं सनानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सनाचं हे ट्विट पाकिस्तानचा विकेटकीपर बॅटसमन कामरान अकमल यानं रिट्विट केलंय.