क्लार्कने कोहलीचं समर्थन करत ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना सुनावलं
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने कोहलीला म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या दोन किंवा तीन पत्रकारांमुळे नाराज होण्याची गरज नाही आहे जे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने कोहलीला म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या दोन किंवा तीन पत्रकारांमुळे नाराज होण्याची गरज नाही आहे जे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या डेली टेलिग्राफने विराट कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्पसोबत केली होती. 'ट्रम्पप्रमाणे कोहली त्यांच्या उणीवा लपवण्यासाठी मीडियाला दोषी ठरवत असल्याचं या वृत्तपत्रात म्हटलं होतं. पण क्लार्कने भारतीय टीमच्या कर्णधाराचं समर्थन केलं आहे.
क्लार्कने एका चॅनेलवर बोलताना म्हटलं की, 'डोनाल्ड ट्रम्पसोबत विराट कोहलीची तुलना करणे मूर्खपणा आहे. विराट कोहली मला आवडतो आणि ऑस्ट्रेलियाची जनता ही त्याच्यावर प्रेम करते. तो ज्याप्रमाणे खेळतो त्यामध्ये मला नेहमी एक ऑस्ट्रेलियन दिसतो आणि ज्याप्रकारे तो आव्हानं स्विकारतो ते मला खूप आवडतं.'
क्लार्कने म्हटलं की,'ऑस्ट्रेलियन मीडिया जे काही लिहितो आहे त्यामुळे स्टीव्ह स्मिथ देखील नाराज आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी त्यांच्या टीमला धरमशालामधली मॅच कशी जिंकता येईल हे सांगितलं पाहिजे.'
क्लार्क म्हणाला, ही सिरीज अॅशेस 2015 सारखी आहे जी जीवन मरणाचा प्रश्न झाली होती. खेळाडू मैदानावर सर्वकाही पणाला लावलं होतं. पण मैदाना बाहेर खेळाडूंची मैत्री कायम होती. हे या सिरीजसाठी चांगले आहे.'
ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने म्हटलं की, 'विराट कोहली कोणत्याही वेळी मोठा स्कोअर करू शकतो. विराट मजबूत खेळाडू आहे आणि तुम्ही एक नंबर आहात तर तुम्हाला मजबूत असणे आवश्यक आहे. चॅम्पियन अशाच प्रकारे खेळतात. धरमशालामध्ये शतक ठोकत तो मालिकेत वापसी करु शकतो. जेव्हा तो बॅटींगसाठी जातो तेव्हा लोकं त्याच्याकडून आशा करतात की त्याने शतकं ठोकावं.'