२१ गोल्ड जिंकणाऱ्या फेल्प्सने असा पराक्रम केला होता
रियो डी जनेरियो। अमेरिकेचा स्वीमर फेल्प्सने मंगळवारी आणखी २ गोल्ड आपल्या नावे केली आहेत. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण २१ गोल्ड आपल्या नावे केले आहेत.
मायकल फेल्प्स याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे, मायकल फेल्प्सचं यश सर्वांना दिसत असलं तरी यामागे शुक्लकाष्ठही लागले होते.
फेल्प्सवर मागच्या वर्षी बंदी लावण्यात आली होती, फेल्प्सवर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आरोप होता. मीडियाने फेल्प्सवर खूप टीका केली.
फेल्प्स दारू पिऊन वेगात बोगद्यात विरोधी दिशेने गाडी चालवत होता. फेल्प्सला या पूर्वी दारूपिऊन गाडी चालवण्याच्या कारणावरून कार चालवली म्हणून शिक्षा झाली आहे.
मायकल फेल्प्स स्विमिंग पूलमध्ये करत असलेल्या पराक्रमावरून बाल्टीमोर बुलेट आणि प्लाईंग फिश या उप नावाने ओळखला जातो.