आता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी
मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.
नवी दिल्ली : मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.
४२ वर्षीय या खेळाडूने नुकतंच हाँग काँग - आयर्लंड युनायटेड संघाकडून खेळताना फक्त ३७८ बॉलात ८२ धावा (६ षटकार-१ चौकार) केल्या . त्याच्या या विस्फोटक फलंदाजीनंतर त्याला हा खोचक सल्ला देण्यात आला आहे.
या माजी कर्णधारावर नेहमीच टीकेची झोड चालू असते आणि आता त्याच्यावर निवृत्ती घेण्याचा दबावही असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र आपण यापुढेही पाकिस्तानकडून खेळु इच्छितो , असं त्यानं स्पष्ट केलंय.
येत्या वेस्ट इंडीज सामन्यांसाठी अद्याप संघ जाहीर झाला नाहीये. त्याच्या या धुंवाधार खेळीने त्याने जणु टीकाकारांचं तोंड बंद केलंय. आता संघ व्यवस्थापन आणि बोर्डाने त्याच्या निवृत्तीवर पुन्हा विचार करायला हवा.