मुंबई : आयपीएलचा दहावा मोसम सुरु होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊडंर मिचेल मार्श यंदाची आयपीएल खेळू शकणार नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे मार्शला आयपीएल खेळता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या बंगळुरू टेस्टवेळीच मार्शला दुखापत झाली होती. यानंतर मार्शच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. मार्शला पुन्हा फिट व्हायला ९ महिन्यांचा काळ लागू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. २०१६च्या मोसमामध्ये पुण्याच्या टीमनं मिचेल मार्शला लिलावामध्ये विकत घेतलं होतं.