मुंबई : टीम इंडियाचा एक सर्वोत्कृष्ठ खेळाडू मोहम्मद कैफ तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा त्याने युवराज सिंगच्या कॅप्टनसी खाली अंडर 19 टीममध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैफ आणि युवराजची जोडी टीम इंडियाची उत्कृष्ठ जोडींमध्ये एक आहे. बॅटींग आणि फिल्डिंग ही दोघांची खासियत आहे. 2003 मधील नेटवेस्ट सीरीजच्या फायनलमध्ये या दोघांनी एक चांगली खेळी केली होती. जी नंतर अनेकांच्या लक्षात राहिली. 


कैफने ट्विट करुन युवराजकडे मदत मागितली आहे. कैफ कोणत्याही अडचणीत सापडला नसला तरी त्याला युवराजची मदत हवी आहे. युवराजकडे त्याने एका प्रश्नाचं उत्तर मागितलं आहे. कैफने ट्विटरवर एक फोटो टाकला आहे. ज्यामध्ये त्याने एका पुस्तकाबाबत प्रश्न विचारला आहे.