रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये फास्ट बॉलर मोहम्मद शमीचं पुनरागमन होऊ शकतं. कॅप्टन विराट कोहलीनंच तसे संकेत दिले आहेत. दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानात विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये बंगालकडून खेळताना शमीनं तामिळनाडूच्या चार बॅट्समनना आऊट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुखापतीनंतर सरावासाठी आम्ही त्याला हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवलं. माझं अजूनही निवड समितीच्या सदस्यांशी बोलणं झालेलं नाही पण चौथ्या टेस्टसाठी कोणत्याही शक्यता नाकारता येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.


रांचीमधली तिसरी टेस्ट अनिर्णित राखण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. पुण्यातली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकल्यानंतर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक करत सीरिजमध्ये बरोबरी केली. आता तिसरी टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील. २५ मार्चपासून धर्मशाळामध्ये चौथ्या टेस्टला सुरुवात होईल.