नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामीचा त्याच्या पत्नीसोबतच्या फोटोवरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगलाय. शामीने त्याचा आणि पत्नीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या फोटोवरुन अनेकांनी शामीवर टीका केलीये. शामीच्या लोकांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. असा फोटा शेअर करताना काहीस कसे वाटले नाही, त्यांला आणि त्याच्या पत्नीला लाज वाटली पाहिजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात.


अनेकांनी तर शामीला सल्लाही दिलाय की धर्माची इज्जत राखावी तसेच अशा प्रकारचा कोणताही फोटो अपलो़ड करु नये.