नवी दिल्ली : टी20 क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवण्याचा विश्वविक्रम दिल्लीच्या मोहित अहलावतनं केला आहे. टी20 क्रिकेटमधली ही पहिलीच ट्रिपल सेंच्युरी आहे. 21 वर्षांच्या मोहितनं मावी इलेव्हन या टीमकडून खेळताना हा पराक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेंड्स इलेव्हनविरुद्ध दिल्लीतल्या ललिता पार्कमध्ये झालेल्या या मॅचमध्ये मोहितनं 72 बॉलमध्ये नाबाद 300 रन केल्या. मोहितच्या या खेळीमध्ये 39 सिक्स आणि 14 फोरचा समावेश होता. मोहितनं मागच्या रणजी सिझनमध्ये दिल्लीकडून पदार्पण केलं होतं.


मोहित अहलावतच्या आधी श्रीलंकेच्या धनुका पथीराणाच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. धनुकानं लँकशायरच्या सॅडलवर्थ लिगमध्ये खेळताना 72 बॉलमध्ये 277 रन केल्या होत्या.