चार फ्लॅटसहीत महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर!
मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.
मुंबई : मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीनं मुंबईच्या एका पॉश भागात चार फ्लॅटस खरेदी केलेत... आणि आपल्या कुटुंबीयांसह तो तिथं राहायलाही आलाय.
आत्तापर्यंत धोनी रांचीस्थित आपल्या घरात राहत होता.... मात्र यापुढे धोनीचा पत्ता मुंबईतला असेल.
धोनीनं ज्या इमारतीत आपलं नवं घर खरेदी केलंय त्यामध्ये बॉलिवूड जगतातील अनेक स्टार्स राहत आहेत. यामध्ये 'रांझणा' सिनेमाचा डायरेक्टर आनंद एल रॉय, विपुल शाह, अभिनेत्री चित्रांगदा सिंह, प्राची देसाई आणि प्रभूदेवा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.