रांची : भारतीय टी-२० आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने निवृत्तीबाबत प्रथम तोंड उघडलेय. निवृत्तीचे वृत्त त्याने फेटाळून लावताना तो चिडला. तुम्ही मला जबरदस्तीने क्रिकेटमधून बाहेर पडायला सांगत आहात का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ६९ रन्सने टीम इंडियाने हरविले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी धोनीला विचारण्यात आले, आपल्या घरच्या मैदानावर तू शेवटचा सामना खेळणार आहेस का? त्यावेळी हे वृत्त फेटाळून लावले. आणि प्रतिप्रश्न केला, तुम्ही मला जबरदस्तीने खेळातून बाहेर जायला सांगत आहात का? माझा फरफॉर्म चांगला आहे. चांगल्या रन्स निघत आहेत, असे असताना तुम्ही हा प्रश्न का विचारता. काही लोक जबरदस्तीने मला  बाहेर पडण्यासाठी ईच्छा व्यक्त करीत आहेत.


धोनीने रांची मैदानावर होत असलेल्या सामन्याबाबत सांगितले, घरच्या मैदानावर सामना असल्याने मला घरी जाण्यास चांगले वाटते. कुटुंबीयांसोबत काही क्षण घालवता येतात. श्रीलंकेला ६९ रन्सने हरविले आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यास आनंद मिळतो आणि सहज चांगले खेळता येते.


यावेळी हार्दिक पांड्याबाबत एका प्रश्नावर सांगितले, त्याला वेळ मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी चांगली संधी मिळाली त्याने त्या संधीचे सोने केले, असे धोनीने त्याचे कौतुक केले.