हरारे : भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये भारत तीन वनडे आणि तीन टी२० मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीबरोबर नवखी टीम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या टीमबरोबर असूनही धोनी हा दौरा चांगलाच एन्जॉय करत आहे. धोनीचं बाईक प्रेमतर सर्वश्रुत आहे. झिम्बाब्वेमध्येही धोनीचं हे बाईक प्रेम दिसून आलं आहे. हरारेमधल्या एका पोलिसाच्या बाईकवरचा आपला फोटो धोनीनं शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या फोटोमध्ये धोनीबरोबर एक पोलीसही आहे.