मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात चांगले नाते आहे. धोनीने अचानकपणे कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ही सूत्रे विराटकडे येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने अचानक हा निर्णय़ जाहीर केल्यानंतर क्रिकेट वर्तुळातूनच नव्हे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही धोनीप्रती आदर व्यक्त केलाय. 


विराटने ट्विटरवरुन धोनीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिलीये. धोनी असा कर्णधार होता ज्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. असं त्याने ट्विटरवर म्हटलंय.