हैदराबाद : आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं पुण्याचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. फायनलमधल्या या विजयानंतर मुंबईनं अनोखा विक्रम केला आहे. आयपीएलच्या दहा मोसमांपैकी तीन मोसमांमध्ये आयपीएलची ट्रॉफी पटकावणारी मुंबई ही एकमेव टीम ठरली आहे.


२०१३, २०१५ आणि २०१७ या मोसमांमध्ये मुंबईनं आयपीएल विजेती टीम ठरली आहे. मुंबईपाठोपाठ चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईटरायडर्सनं प्रत्येकी दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जनं २०१० आणि २०११मध्ये तर गौतम गंभीरच्या केकेआरनं २०१२ आणि २०१४मध्ये विजय मिळवला होता.