रोहितची मुंबई भिडणार झहीरच्या दिल्लीशी
आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीबरोबर होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रात्री आठ वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीबरोबर होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रात्री आठ वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. या मोसमामध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या सहा मॅचपैकी पाच मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. पुण्याविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमधला पराभव वगळता मुंबईनं सगळ्या मॅच जिंकल्या आहेत.
पॉईंट्स टेबलमध्येही १० पॉईंट्ससह मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर झहीर खानच्या दिल्लीनं ५ मॅचमध्ये २ विजय मिळवले आहेत. पॉईंट्सटेबलमध्ये दिल्ली ४ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.