बंगळूरु : आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी पुण्याला १३० धावांची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मात्र हा निर्णय मुंबईला तितकासा फायद्याचा ठरला नाही. मुंबईच्या फलंदाजांनी पुण्यासमोर पत्करलेली हार पाहता १०० धावांतच मुंबईचा संघ गुंडाळला जाणार असे वाटत होते.


मात्र कृणाल पंड्या मदतीसाठी धावून आला. त्याने केलेल्या ४७ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईला १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली.