बंगळूरु : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील अखेरचा सामना चांगलाच रंगतदार ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यातील अखेरची ओव्हर निर्णायक ठरली. शेवटच्या ६ बॉलमध्ये पुण्याला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. यावेळी पुणे विजय मिळवेल असे सर्वांना वाटले होते. मात्र मुंबईचे गोलंदाज पुण्यावर भारी पडले.


अशी रंगली अखेरची ओव्हर


१९.१ - जॉन्सनच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर तिवारीने चौकार मारला.


१९.२ - जॉन्सनने तिवारीचा अडसर दूर केला. पोलार्डने तिवारीचा कॅच घेत त्याला बाद केले.


१९.३ - जॉन्सनने स्टीव्हन स्मिथला रायडूकडे झेल देण्यास भाग पाडले आणि पुण्याच्या डावाला खिंडार पाडले. मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या.


पुण्याला जिंकण्यासाठी ३ बॉलमध्ये ७ धावांची गरज 


१९.४ - जॉन्सनच्या बॉलवर वॉशिंग्टनने घेतली एक धाव.


१९.५ - ख्रिस्तियनने घेतल्या दोन धावा


१९.६ - एका बॉलमध्ये विजयासाठी ४ धावा. मात्र पुण्याला केवळ २ धावा करता आल्या आणि मुंबईचा विजय झाला.