मुंबई : ३० एप्रिलनंतरचे IPLचे सर्व सामने राज्याबाहेर घेण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, आज आयपीएलच्या ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेय. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना मोठा दिलासा मिळालाय.


का राज्याबाहेर सामने हलविलेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान कित्येक लाख लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सध्या राज्य दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी ‘आयपीएल’ सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर बंदी लागू करण्यात आली.


सामने अन्यत्र हलवण्याची प्रक्रिया


३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला बीसीसीआय तसेच आयपीएलच्या कुठल्याही संघाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. मात्र, अन्य सामने अन्यत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्याने ३० एप्रिलनंतरचे सामने विशाखापट्टण्म येथे हलवलेत. मात्र, २९ एप्रिल रोजी पुण्यात ‘सुपरजायंट्स पुणे’ आणि ‘गुजरात लायन’ यांच्यादरम्यान सामना होणार आहे. 


आमच्यासाठी दोन दिवस अपुरे


त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १ मे रोजी पुण्यातील मैदानावरच ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत सर्व व्यवस्था करणे शक्य नाही, असा दावा करण्यात आला. या विनंतीचा विचार करुन उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली.