पुणे: मुंबई टीमनं रणजी करंडकाला गवसणी घालत रणजीमधील आपलं वर्चस्व कायम राखलय. मुंबईनं 41व्यांदा रणजी करंडक जिंकण्याची किमया केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात रंगलेल्या फायनलमध्ये मुंबईनं सौराष्ट्रला इनिंग आणि 21 रन्सनं पराभूत करत करंडकावर नाव कोरलं. शादुर्ल ठाकूर, धवल कुलकर्णी आणि श्रेयस अय्यर हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 


श्रेयस अय्यरनं शानदार सेंच्युरी झळकावली. श्रेयसलाच 'प्लेअर ऑफ द मॅच'नं गौरवण्यात आलं. शार्दुल ठाकूरनं दोन्ही इनिंग मिळुन आठ तर धवल कुलकर्णीनं सात विकेट्स घेतल्या. 


सौराष्ट्रानं पहिल्या आणि दुस-या इनिंगमध्ये अनुक्रमे 235 आणि 115 रन्स केल्या. तर मुंबईनं पहिल्या इनिंगमध्ये 371 रन्स केल्या. गेल्या दोन सीझनमध्ये मुंबईला रणजी करंडक जिंकण्यात अपयश आलं होतं. मात्र या सीझनमध्ये मुंबईनं कमबॅक करत रणजीमधील आपलं वर्चस्व कायम राखलं.