मुंबई : आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसला या वर्षातील घरच्या मैदानातील सर्वश्रेष्ठ खेळाडू  म्हणून गौरवण्यात आलं आहे. श्रेयस म्हणतो की, टीममध्ये समावेश न होणं हे माझ्यासाठी सकारात्मक आहे यामुळे मी आणखी चांगली कामगिरी करु शकेल.'


२१ वर्षीय खेळाडूने रणजी ट्राफीमध्ये ७३.८० च्या रनरेटने १३२१ रन केले आहेत. मुंबईच्या ४१ व्या रणजी ट्राफीच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.