रांची :  भारतीय वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डोळ्याची  पारणे फेडणारा रनआऊट केला आहे. आपल्या घरच्या मैदानावर चौथी वनडे मॅच खेळताना हा अद्भूत रनआऊट केला आहे. 


पाहा व्हिडिओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



४६ व्या षटकात न्यूझीलंडचे फलंदाज रन काढण्याची कोणतीही संधी सोडत नव्हते. त्यावेळी रॉस टेलरने फाइन लेगला चेंडू टोलावून दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. धवल कुलकर्णीचा कमकुवत थ्रो एका अद्भूत आणि ब्रिलियंट रन आऊटला कारणीभूत ठरला. 


यावेळी धोनी स्टंपकडे पाठकडून उभा होता. पण त्याने स्टंपकडे न पाहता अझरुद्दीन स्टाईलने बॉल फेकला आणि काय तर एक अद्भूत आणि डोळ्याची पारणे फेडणारा रन आऊट पाहायला मिळाला.