नवी दिल्ली : डोपिंग प्रकरणी भारताचा मल्ल नरसिंह यादव याच्या रिओ ऑलिंपिक वारीचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. नाडा आज या प्रकरणी आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोपिंग प्रकरणी नसहिंय यादव दोषी आढळल्यास त्याच्यावर चार वर्ष प्रतिबंध लावण्यात येऊ शकतो. 5 जुलैला झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये नरसिंगच्या रक्तात उत्तेजक द्रव्याचे अंश सापडले होते.


त्याच्या A आणि B दोन्ही सॅम्पल्समध्ये हे अंश आढळल्यानं त्याच्या ऑलिम्पिक वारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालयं. नाडासमोर त्याची चौकशी पूर्ण झालीयं... आज त्याच्या बाबतचा फैसला होणार आहे.