रिओ : नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. CAS अर्थातच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं नरसिंगवर ही कारावाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरसिंगकडे आपल्याला डोपिंगमध्ये अडकवण्यात आल्याचे कुठलेही पुरावे नव्हते. त्यामुळेच CAS नं त्याच्यावर बंदी घातली. नरसिंग यादव 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधीत्व करणार होता. मात्र, आता त्याला बंदी घातल्यानं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही. 


नरसिंगप्रकरणामुळे भारताची ऑलिम्पिकमध्ये चांगलीच नाचक्की झाली आहे. नाडानं नरसिंगला क्लिन चिट दिली होती त्याला वाडानं आव्हान दिलं होतं. वाडाच्या अपीलवर सुनावणी झाली आणि CAS नं नरसिंगच्या विरोधात निर्णय दिला.