रांची : कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथी वन-डे मॅच रंगणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फलंदाजीत पुन्हा सूर गवसलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजचौथ्या वन डेमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका विजय साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरिजमध्ये सध्या टीम इंडियाकडे 2-1 अशी आघाडी आहे, त्यामुळं आजची मॅच जिंकून सीरिजवर कब्जा करण्याचा धोनी ब्रिगेडचा प्रयत्न असेल तर न्यूझीलंडचा संघ आजची मॅच जिंकून सीरिजमधील आव्हान टीकवण्याचा प्रयत्न करतील. पण टीम इंडियाचा फॉर्म बघता आजची मॅच जिंकून सीरिजवर कब्जा करतील असं दिसत आहे.


टीम इंडिया : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मनदीप सिंह


न्यूझीलंड संघ : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, रॉस टेलर, कोरी अ‍ॅण्डरसन, ल्यूक राँची, जिमी नीशम, मिशेल सँटनर, टीम साऊथी, मॅट हेनरी, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, अँटोन डेवसिच, बी.जे. वॉटलिंग, डग ब्रेसवेल.