`मी आजही नोकियाचा जुना मोबाईल वापरतो` - आशिष नेहरा
मुंबई : सोशल मीडिया म्हणजे सेलिब्रिटींसाठी आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा एक उत्तम मार्ग...
मुंबई : सोशल मीडिया म्हणजे सेलिब्रिटींसाठी आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा एक उत्तम मार्ग... सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटीजचे आज सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटर आशिष नेहरानं मात्र आत्तापर्यंत लोकांना माहीत नसलेलं आपलं एक गुपित नुकतंच उघड केलंय.
एका कार्यक्रमा दरम्यान आशिषला 'बांग्लादेशधील चाहत्यांच्या सोशल मीडियावरील वादावर तुला काय वाटतं?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाला बगल देण्यासाठी नेहरानं अजब उत्तर दिलं.
'मी आजही माझा जुनाच नोकियाचा मोबाईल वापरतो. मी फेसबूक किंवा ट्विटरवर नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारताय' या नेहराच्या उत्तरावर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं.
इतका मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू इतका जुना मोबाईल वापरतो यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का? पण, प्रश्न टाळण्यासाठी त्याने दिलेल्या उत्तराची मात्र तो नसलेल्या सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा होतेय.