नेहरा, युवराजच्या समावेशाने हैदराबादची ताकद वाढली
टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीनंतर आता लवकरच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. येत्या नऊ एप्रिलपासून आयपीएल लीग सुरु होतेय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाज आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी दमदार कामगिरी केली.
मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीनंतर आता लवकरच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. येत्या नऊ एप्रिलपासून आयपीएल लीग सुरु होतेय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाज आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी दमदार कामगिरी केली.
याचा फायदा आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादला होणार आहे. यंदा हे दोन्ही क्रिकेटपटू सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहेत. त्यांच्यासह दीपक हूडा, आदित्य तरे, अभिमन्यू मिथुन, आशिष नेहरा, मुस्तफीझुर रेहमान, बरिंदर सरण आणि इतर अनेकांचा समावेश आहे.
यांच्यामुळे हैदराबाद संघाची ताकद वाढलीये. याचसोबत पहिल्या फळीत सलामीवीर शिखर धवन, केन विल्यमसन्स, डेविड वॉर्नर मधल्या फळीत युवराज, हुडा, मॉर्गन आणि हेनरिक यांच्यासारखे फलंदाज आहेत. गोलंदाजीत त्यांच्याकडे नेहरा, ट्रेंट बोल्ट, मुस्तफीझुर रेहमान, अभिमन्यू मिथुन, बरिंदर सरण आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाचा हैदराबादचा संघ समतोल वाटतो.