नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या खटल्याला नवी कलाटणी मिळालीये. केंद्र सरकार आणि बीसीसीआय हे क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यवस्थापकीय समितीसाठी नावं सुचवू शकतात, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आज होणारी समितीच्या नावांची घोषणा पुढे ढकलण्यात आलीये.


कोर्टानं नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं 9 नावं यापूर्वीच सुचवली आहेत. आता स्वतः बीसीसीआय आणि केंद्र सरकार बंद लिफाफ्यांमध्ये आपली नावं कोर्टाला सादर करेल. त्यानंतर समितीबाबत न्यायालय फैसला करेल. या प्रकरणाची पुढली सुनावणी 30 तारखेला होणार आहे.