मुंबई : केन विल्यमसनने विराटचं भरभरुन कौतुक केलं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराटविषयी बोलताना म्हणतो, 'जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होत असला, तरी विनयशील स्वभावामुळं त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विल्यमसननं विराटची महान फलंदाजांमध्ये गणना करताना म्हटलं आहे, 'भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पाहून आपल्याला फलंदाजीचे बारकावे शिकायला मिळाले.'
 


विराटची फलंदाजी पाहायला आपल्याला भावतं आणि त्याच्याकडून खूप काही शिकता येतं, असंही त्यानं बोलून दाखवलं.


कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅट्समध्ये प्रतिस्पर्धी आक्रमणावर वर्चस्व गाजवण्याची विराटची गुणवत्ता खास असल्याचं त्याने म्हटलंय, त्याच्याविषयी आपल्या मनात आदर असल्याचं विल्यमसननं सांगितलं