रांचीच्या रस्त्यांवर हमर घेऊन निघाला धोनी, बघत राहिली न्यूझीलंड टीम
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचं बाईक आणि कारबाबतचं क्रेज सगळ्यांनाच माहित आहे. तो रांचीच्या रस्त्यांवर नेहमी कार आणि बाईकवर अनेकांना दिसतो. न्यूझीलंडच्या टीमने ही तोच अनुभव घेतला.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचं बाईक आणि कारबाबतचं क्रेज सगळ्यांनाच माहित आहे. तो रांचीच्या रस्त्यांवर नेहमी कार आणि बाईकवर अनेकांना दिसतो. न्यूझीलंडच्या टीमने ही तोच अनुभव घेतला.
न्यूझीलंडचे खेळाडू हे बसमधून प्रवास करत होते तेव्हा त्यांच्यासोबत एक हमर गाडीही होती आणि ती गाडी चालवत होता धोनी. न्यूजीलंडची टीमही त्याच्या या ड्राईविंगचा आनंद घेतांना दिसले.
भारत आणि न्यूजीलंड यांच्यात चौथी वनडे रांची मध्ये म्हणजेच धोनीच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. त्यासाठी धोनी आणि न्यूझीलंड टीम रांचीमध्ये पोहोचली आहे.
वन-डे सीरिजमध्ये 2-1 ने भारत आघाडीवर आहे. धोनीने मागच्या सामन्यात चौथ्या क्रमाकांवर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीने ९१ बॉलमध्ये ८० रन केले आणि वनडे करिअरमध्ये ९००० रन पूर्ण केले. 50 हून अधिकच्या रनरेटने ९००० रन करणारा तो पहिला फलंदाज ठरला.