मुंबई : भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता सुधीर गौतमला सगळेच ओळखतात. गौतम सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन आहे. प्रत्येक सामन्यात झेंडा फडकावताना, शंख हातात घेतलेला सुधीर आपल्याला स्टेडियममध्ये दिसतो. गेल्या काही वर्षांपासून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही असाच एक चाहता स्टेडियममध्ये पाहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन, धोनीनंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीचाही असाच एक चाहता समोर आलाय. ३३ वर्षीय निकाश ओडिसाच्या कंधमाल जिल्ह्यात राहतात. ते बस कंडक्टर आहेत. निकाश आतापर्यंत चार वेळा कोहलीला भेटलाय. तो स्वत:ला विराटचा मोठा चाहता मानतो. यासाठी त्याने आपले कामही सोडून दिलेय. 


विराटचा जबरा फॅन मानणाऱ्या या निकाशने सामना पाहण्यासाठी स्वत:च्या आईचे दागिनेही विकले होते. निकाशने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याने विराटसोबतच्या भेटीचे काही क्षण सांगितले. विराट माझ्याशी आपलेपणाने वागतो. जेव्हा कधी मला तो भेटलाय तेव्हा नेहमीच त्याने माझी विचारपूस केलीये, असं निकाशने सांगितले.