मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे, पण या टेस्टमध्ये एकही मुंबईकर खेळाडू मैदानात खेळताना दिसत नाहीये. भारतीय टेस्ट क्रिकेटमधलं हे अनोखं रेकॉर्ड आहे. आत्तापर्यंत 1933पासून मुंबईमध्ये झालेल्या प्रत्येक टेस्टमध्ये मुंबईच्या खेळाडूचा समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टेस्ट सुरु होण्याआधी मुंबईकर अजिंक्य रहाणे जखमी झाला होता. तर मोहम्मद शमीऐवजी निवड समितीनं मुंबईचाच असलेल्या शार्दूल ठाकूरला संधी दिली पण त्याचा संघात समावेश झाला नाही.


मुंबई म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी. एका काळी मुंबईचे सहा ते सात खेळाडू टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचे. वानखेडे स्टेडियमवर 1974-75पासून आत्तापर्यंत 25 टेस्ट मॅच खेळल्या गेल्या आहेत, तर ब्रेबॉर्न स्टेडियमवर 18 अशा एकूण 44 टेस्ट मुंबईत खेळवल्या गेल्या आहेत.