रिओ दी जेनेरो : आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांचे संबंध अतिशय खराब आहेत. हे दोन्ही देश सतत एकमेकांचा द्वेष करतात. हा द्वेष इतका टोकाला गेला आहे की या देशांमध्ये सध्या युद्धाचे वारे वाहू लागलेत.

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग याच्या विक्षिप्तपणाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. या हुकूमशाहाला मृत्युदंड ही फार मोठी गोष्ट वाटत नाही. अतिशय निर्दयी असा हा हुकूमशाहा आपल्या जवळच्या व्यक्तीला मृत्युदंड द्यायलाही मागे-पुढे पाहत नाही.

हॉंग यू जूंग हिने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. पदक जिंकणारी हॉंग यू जूंग ही उत्तर कोरियाची पहिली महिला जिमनॅस्ट आहे. तिच्याबद्दलच्या या बातमीमुळे उत्तर कोरियाच्या संघात सध्या भीतीचे वातावरण आहे.