रिओमध्ये आता न्यूड ऑलिम्पिकला सुरुवात
रिओ ऑलिम्पिकचे रविवारी सूप वाजल्यानंतर आता रिओमध्ये न्यूड ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे.
रिओ : रिओ ऑलिम्पिकचे रविवारी सूप वाजल्यानंतर आता रिओमध्ये न्यूड ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. रिओमधल्या अब्रीको बीचवर या ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. रिओमधला हा एकमेव समुद्र आहे जिथे पर्यटकांना नग्न व्हायला परवानगी आहे. या न्यूड ऑलिम्पिकमध्ये फूटबॉल, बीच व्हॉलीबॉल, स्विमिंग या खेळांचा समावेश आहे.
ग्रीस हे ऑलिम्पिकचं जनक आहे. या ग्रीसवासियांना श्रद्धांजली आणि मानवंदना देण्यासाठी या न्यूड ऑलिम्पिकचं आयजोन करण्यात आलं आहे. प्राचीनकाळी ग्रीसमध्ये खेळाडू नग्न अवस्थेत हे खेळ खेळायचे. आपल्या शरिराचं प्रदर्शन करण्यासाठी आणि ग्रीस लोकांचा देव 'ज्यूस'ना श्रद्धांजली देण्यासाठी प्राचीनकाळी न्यूड ऑलिम्पिक खेळलं जायचं.