नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षीचे हरियाणात जंगी स्वागत करण्यात आले. तिला बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची सदिच्छा दूत बनवण्यात आल्यामुळे तिचा आनंद गगणात मावेनासा झालाय. गुरूवारी सकाळी साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला. 'मी तुला वेळ देईन पण तू माझ्याशी कुस्ती लढणार नाही, अशी अपेक्षा करतो', असे मजेशीर उत्तर सेहवागने साक्षीला ट्विट करूनच दिले.


सेहवागने ब्रिटीश पत्रकाराचा घेतला समाचार


दरम्यान, भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळल्याने एका ब्रिटीश पत्रकाराने खिल्ली उडवली होती. या पत्रकाराला सेहवागने चोख प्रत्युत्तर दिले होते. पत्रकार पियर्स मॉर्गनने भारताने दोन पदके मिळवल्यानंतर केलेल्या जल्लोषावर ट्विट करताना म्हटले होते, १.२ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाने केवळ दोन पदके आणली आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट!, हे ट्विट सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले होते.


सेहवागने त्याला प्रत्युत्तर दिले, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करायला आवडतो. पण ज्या इंग्लंडने क्रिकेटचा शोध लावला त्यांना तर अजूनही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ते अजूनही वर्ल्ड कप खेळतात, हे किती लाजीरवाणे!