ऑलिम्पिक खेळाडूंवर डोपिंग टेस्टची टांगती तलवार कायम...
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये पाच हजाराहूंन अधिक खेळाडूंची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही माहिती दिली. डोपिंग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत 4,500 खेळाडूंचे मूत्र तर 1000 खेळाडूंचे रक्त तपासले जाणार आहे.
डोपिंगसाठी निवड करण्यात आलेल्या 2200 खेळाडूंवर नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय आणखी 700 खेळाडूंची डोप टेस्ट घेण्याची विनंतीही करण्यात आली असल्याचं बाक यांनी सांगितलं.
या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच डोप टेस्टमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूला खेळ पंचायत न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.
या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच डोप टेस्टमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूला खेळ पंचायत न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.