कुंबळेच्या `टेस्ट`मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल
मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
बंगळुरु : मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा मूड बदलण्यासाठी नुकतीच कोचपदी निवड झालेल्या अनिल कुंबळेनं बॅट्समनची टेस्ट घेतली.
टेस्ट क्रिकेटसारखीच बॅटिंग कुंबळेनं भारतीय खेळाडूंना करायला लावली. यासाठी टेस्ट मॅचसारखीच फिल्डिंग लावण्यात आली. या मॅचमध्ये एक तास आऊट न व्हायचं चॅलेंज कुंबळेनं बॅट्समनना दिलं होतं.
कुंबळेच्या या टेस्टमध्ये फक्त अजिंक्य रहाणेच पास झाला. एक तास विकेट न गमावता रहाणे मैदानात टिकून राहिला. एक तासाच्या या टेस्टमध्ये विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय दोन वेळा आऊट झाले, तर केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा एक वेळा आऊट झाले.