मुंबई : ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे. भारताची महिला आणि पुरुष टीम यांच्याबरोबरच ए टीम आणि अंडर १९ टीमचाही यामध्ये समावेश असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑपो बीसीसीआयला मॅचसाठी जवळपास ४.१ कोटी रुपये तर आयसीसी टूर्नामेंटच्या मॅचसाठी जवळपास १.५६ कोटी रुपये देणार असल्याची माहिती आहे. जून २०१७ ते मार्च २०२२ या काळामध्ये टीम इंडिया २५९ मॅच खेळणार आहे. यामध्ये ६२ टेस्ट, १५२ वनडे आणि ४५ टी-२० चा समावेश आहे. २०१९ चा वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कपचाही यामध्ये समावेश आहे.


याआधी स्टार इंडियाकडे टीम इंडियाचं चार वर्षांसाठी प्रायोजकत्व होतं. पण पुन्हा या कराराचं नुतनीकरण न करण्याचा निर्णय स्टारकडून घेण्यात आला.