IPL : ऑरेंज कॅप पुन्हा गौतम गंभीरकडे
गौतम गंभीरने सर्वाधिक रन्स करताना ऑरेंज कॅप आपल्याकडेच राखली आहे.
हैदराबाद : आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा दबदबा दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा विजय मिळवला तो गौतम गंभीरच्या चांगल्या खेळीने. गंभीरने ९० रन्स केल्यात. याबरोबर त्यांने सर्वाधिक रन्स करताना ऑरेंज कॅप आपल्याकडेच राखली आहे.
गौतम गंभीरने ऑरेंज कॅपचा पहिला मान पटकावला होता. त्यानंतर एरोन पिंचने १२४ रन्स करत ही कॅप आपल्याकडे घेतली. मात्र, हैदराबाद येथे खेळाताना गौतम गंभीर कर्णधाराला साजेसा खेळ करत ९० रन्स करत १९२ रन्सचा टप्पा गाठला. त्याने ही कॅप पिंचकडून आपल्याकडे घेतली.