भारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर
वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.
दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे. ही वेस्ट इंडिजविरुद्धची ही सीरिज भारतानं 2-0नं जिंकली असली तरी भारत टेस्ट क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
क्रमवारीमध्ये एक नंबरवर राहण्यासाठी भारताला चौथी टेस्ट जिंकण बंधनकारक होतं, पण पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे ही टेस्ट मॅच ड्रॉ झाली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेनं व्हाईटवॉश केलं, तसंच पाकिस्तान आणि इंग्लंडमधली सीरिज 2-2नं ड्रॉ झाल्यामुळेही पाकिस्तानला नंबर एकवर जायला मदत झाली.
आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पाकिस्तान पहिल्यांदाच नंबर एकवर पोहोचलं आहे. या क्रमवारीमध्ये भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
काय आहे आत्ताची क्रमवारी
टीम पॉईंट्स
1 पाकिस्तान 111
2 भारत 110
3 ऑस्ट्रेलिया 108
4 इंग्लंड 108
5 न्यूझिलंड 99
6 श्रीलंका 95
7 दक्षिण आफ्रिका 92
8 वेस्ट इंडिज 67
9 बांग्लादेश 57
10 झिम्बाब्वे 8