कराची : भारतीय लष्काराने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानमधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इंजमाम उल हकने देखील यावर प्रतिक्रिया देत भारताला आव्हान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजमामने क्रिकेट संबंधित हे आव्हान दिलं आहे. त्याने म्हटलं की, आम्ही लवकरच भारताकडून टेस्ट रँकींगमधलं पहिलं स्थान परत मिळवू. त्याने म्हटलं आहे की, २००७ पासून आम्ही भारतासोबत क्रिकेट नाही खेळलो. आम्ही काही नाही करु शकत पण तरी पाकिस्तान इतर संघांचा पराभव करुन भारताकडून पहिलं स्थान परत मिळवू शकतो.


इंजमामने म्हटलं की, 'पाकिस्तान मागील ६ वर्षांपासून घरच्या मैदानावर न खेळण्याच्या मुद्द्यावर उभरतांना श्रेयाचा हकदार आहे. भारताला पुढच्या काही महिन्यात घरगुती मैदानावर १३ टेस्ट मॅच खेळायचे आहेत. आम्ही २००९ पासून घरच्या मैदानावर खेळलेलो नाही. पण माझं अजूनही असं मत आहे की, पाकिस्तानी टीम कोठेही आणि कोणाविरोधातही चांगली खेळी करु शकते.'