कराची : माजी पाकिस्तानचा कर्णधार वसीम अकरम विरोधात मंगवारी सत्र न्यायालयाने अजामीन पात्र अटक वारंट जारी केलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये ३१ वेळा गैरहजर राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरमने ऑगस्ट २०१५ मध्ये मेजर अमीनुर रहमान यांच्याविरोधात एका रस्ते अपघातासंबंधात तक्रार दाखल केली होती. मेजरची गाडी अकरम यांच्या गाडीला ठोकली गेली होती. त्यानंतर सेवानिवृत या अधिकाऱ्याने रिवाल्वर काढून हवेत गोळीबार केला होता. यानंतर दोघांनी हा वाद मिटवला त्यामुळे दोघेही सुनावणी दरम्याने गैरहजर राहिले.


सत्र न्यायालय पुढील सुनावणी १७ जानेवारीला करणार आहे. त्यामुळे पोलिसांना कोर्टाने सूचना दिल्या आहेत की, अकरमला उपस्थित करा. अकरम सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियात आहे.