न्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.
वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.
न्यूझीलंडच्या क्रिकेट दौऱ्यावर पाकिस्तानी संघ गेलाय. नेल्सनस्थित हॉटेलमध्ये पाकिस्तानी संघ वास्तव्यास आहे. भूकंपाचा धक्का जाणवल्याचा अनुभव फारच भितीदायक होता अशी प्रतिक्रिया दौऱ्यावर असलेले पाकिस्तानी टीमचे व्यवस्थापक वसीम बारी यांनी दिलीये. जेव्हा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा आम्ही चांगलेच घाबरलो. मात्र आम्हाला लगेचच सुरक्षितरित्या हॉटेलमधून बाहेर आणण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
येत्या 17 नोव्हेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरु होतेय.