कोलकाता : भारताबद्दल जास्त प्रेम दाखविल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार शाहिद आफ्रीदीवर चोहोबाजूंनी टीका केली जातेय. या टीकेनंतर आता आफ्रीदी बॅकफूटवर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत प्रेमाप्रकरणी मंगळवारी आफ्रीदीला स्पष्टीकरण द्यावे लागले. माझा बोलण्याचा उद्देश केवळ भारतातील चाहत्यांचे आभार मानणे आणि एक सकारात्मक संदेश देणे होता असं आफ्रीदीने म्हटलंय. 


आफ्रीदीने भारतात आल्यानंतर इतर देशांपेक्षा भारतात खेळणे आवडते तसेच पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याच्यावर कडाडून टीका करण्यात आली. याप्रकऱणी त्याला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली. 


पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही असे वक्तव्य करणाऱ्या खेळाडूंची लाज वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आफ्रिदीने ट्विटरवर ऑडियो संदेश देताना, मी पाकिस्तानी संघाचा केवळ कर्णधारच नाही तर सर्व पाकिस्तानी लोकांचे प्रतिनिधित्व करतो. माझ्या वक्तव्याला कोणी सकारात्मक अर्थाने पाहिल्यास मी केलेल्या वक्तव्याचा अर्थ कळेल. माझ्यासाठी पाकिस्तानी चाहते तेवढेच महत्त्वाचे आहेत. पाकिस्तानमुळे माझी ओळख आहे, असे आफ्रीदी म्हणाला.