दुबई : पाकिस्तानला टीमला २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये  संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण पाकिस्तानने यासाठी कोणतीही समाधानकारक कामगिरी दाखवलेली नाही. पाकिस्तानची आयसीसीच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सध्या ८९ गुणांसह २ अंकांनी बांगलादेशच्या मागे आहे, तसेच २ गुणांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे. इंग्लंडशिवाय ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत आयसीसी वनडे क्रमवारीत टॉप ७ टीम्स वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार आहेत.


पाकिस्तान टीमच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही, तसेच वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानच्या गुणांची संख्या फारच कमी आहे, असं आयसीसीने सांगितलंय.पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत १-४ असं हरवलं आहे, म्हणूनच पाकिस्तानला बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरूद्ध विजय मिळवणं गरजेचं आहे.


आयसीसीच्या क्रमवारीत ११६ गुण मिळवून दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया १२० गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर  टीम इंडियाला ११२ गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे.