पाकिस्तानच्या अझर अलीचा विक्रम, डे-नाईट टेस्टमध्ये झळकवली पहिली ट्रिपल सेंच्युरी
पाकिस्तानचा बॅट्समन अझर अलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे.
दुबई : पाकिस्तानचा बॅट्समन अझर अलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. डे-नाईट टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी करणारा अझर पहिलाच खेळाडू ठरला आहे. अझरच्या आधी डे-नाईट टेस्टमध्ये कोणालाच सेंच्युरी मारता आली नव्हती. याआधी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये डे-नाईट टेस्ट झाली होती.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या या टेस्टमध्ये अझर अलीनं नाबाद 302 रनची खेळी केली. अझर अलीची ट्रिपल सेंच्युरी झाल्यानंतर पाकिस्ताननं लगेचच 579-3 या स्कोअरवर डाव घोषित केला.