नवी दिल्ली : कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये जम्मू-काश्मीरचा ऑल-राउंडर क्रिकेटर परवेज रसूलला टी20 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. पण डेब्यूसोबतच तो वादात सापडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये टी-20 सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान तो च्युईंगम चावत असल्याच दिसलं. यानंतर ट्विटवर त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर लोकेंद्र सिंहने ट्विट केलं की, रसूलसाठी राष्ट्रगीतापेक्षा च्युइंगम चावणे अधिक महत्त्वाचं आहे. चिन्मय जावेलकरने म्हटलं की, राष्ट्रगीतादरम्यान आरामशीर उभा राहून च्युईंगम खातांना पाहून दु:ख झालं.


तो भारताची जर्सी घालू शकतो पण राष्ट्रगीत नाही बोलू शकत असं क्षितिज शर्माने ट्विट केलं. बांग्लादेश विरोधात वनडेमध्ये १० ओव्हरमध्ये त्याने ६० रन देत २ विकेट घेतले होते. इंग्लंडसोबत वनडे सीरीज आधीही सराव सामन्यात त्याला सहभागी करुन घेतलं होतं. ३८ रन देत त्याने ३ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये तो पुणे वॉरियर्स, सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळत होता.