नवी दिल्ली : १ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती सांगितली की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दुनिया न्यूज'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)चे चेअरमन शहरयार खानने यांनी म्हटलं की, य़ा प्रकरणात एकदा आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफी सुरु असतांना भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करु. ४ जूनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान ही चर्चा होऊ शकते.


२०१४ मध्ये दोन्ही देशांमध्ये एका कराराचा मान न ठेवल्यामुळे पीसीबीने ३ मेला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ला एक नोटीस पाठिवली होती. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये 2015 ते 2023 या वर्षांमध्ये ६ द्विपक्षीय श्रृंखलेचं आयोजन होणार होतं. पीसीबीने 20 ते 30 कोटी डॉलरच्या नुकसानीचं आरोप करत भारतीय क्रिकेट बोर्डाकडून द्विपक्षीय श्रृंखला न खेळल्यामुळे ६ कोटी डॉलरची नुकसान भरपाई मागितली होती. बीसीसीआयने हे म्हटलं आहे की, त्यांनी पीसीबीसोबत द्विपक्षीय श्रृंखलेच्या प्रकरणात कोणत्याही करारावर स्वाक्षरी नव्हती केली. सोबतच बोर्डाने हे देखील म्हटलं की, पाकिस्तानसोबत खेळण्याच्या निर्णय सरकारच्या परवानगी शिवाय नाही घेतला जाणार.'