नोएडा : भारताचा स्पिनर प्रग्यान ओझा दुलीप ट्रॉफीची मॅच खेळताना जखमी झाला आहे. इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीनमध्ये नोएडामध्ये सुरु असलेल्या मॅचवेळी फिल्डिंग करताना प्रग्यान ओझाच्या डोक्याला बॉल लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस गोपालच्या बॉलिंगवर पंकज सिंग बॅटिंग करत असताना बॉल मिड ऑनला उभा असलेल्या ओझाकडे आला, त्यावेळी हा अपघात झाला. 


प्रग्यान ओझाला असा लागला बॉल



 बॉल लागल्यानंतर प्रग्यान ओझाला मैदानातूनच स्ट्रेचरवरून नेण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुखापतीतून ओझा बाहेर येत असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.