प्रणव धनावडेनंतर आणखी एका मराठी मुलाचा त्रिशतकी विक्रम
कल्याणच्या प्रणव धनावडेने आंतरशालेय क्रिकेटमध्ये १००० धावांचा विश्वविक्रम रचला. आता आणखी एका मराठी मुलाने नवा विक्रम केलाय. ५० षटकांच्या सामन्यात विक्रमी त्रिशतक झळकावलंय.
मुंबई : कल्याणच्या प्रणव धनावडेने आंतरशालेय क्रिकेटमध्ये १००० धावांचा विश्वविक्रम रचला. आता आणखी एका मराठी मुलाने नवा विक्रम केलाय. ५० षटकांच्या सामन्यात विक्रमी त्रिशतक झळकावलंय.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या प्रितम पाटील याने १३४ चेंडूमध्ये ३०६ धावांची तडाखेबंद खेळी केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एका स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याचा सामना नांदेडविरुद्ध होता. या सामन्यातच सलामीवीर प्रितम पाटीलने ही कामगिरी केली
.
२८ चौकार आणि २६ षटकारांची आतषबाजी करत प्रितमने शानदार त्रिशतक ठोकले आणि वनडेतील नवा विक्रम रचला. प्रितमच्या फटकेबाजीमुळे पीवायसीने ५० षटकांत सहा बाद ५९४ धावांचा डोंगर रचला.
मात्र, नांदेड संघ पीवायसी संघापुढे टिकला नाही. केवळ ८६ धावांत त्यांचा खुर्दा उडाला. पीवायसीने हा सामना ५०८ धावांनी जिंकला. त्यानंतर प्रितमला सगळ्यांनीच डोक्यावर घेतले. त्यानंतर प्रितमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.