विजय-पुजाराने रांची टेस्टमध्ये केला रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला सावधपणे खेळ खेळला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दूसऱ्या विकेटसाठी १०२ रन्सची भागीदारी केली. सोबतच त्यांनी एक रेकॉर्ड देखील त्यांच्या नावे केला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला सावधपणे खेळ खेळला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दूसऱ्या विकेटसाठी १०२ रन्सची भागीदारी केली. सोबतच त्यांनी एक रेकॉर्ड देखील त्यांच्या नावे केला आहे.
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या जोडीने भारतासाठी टेस्ट सामन्यामध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात अधिक रनरेटने २ हजार पेक्षा अधिक रन बनवले. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने आतापर्यंत ३७ इनिंगमध्ये ६६.६ च्या रनरेटने एकूण २४६६ रन्स केले आहेत. सोबतच या जोडीने माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला आहे.
टेस्ट मॅचमध्ये सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी ७१ इनिंगमध्ये ६१.४ च्या रनरेटने ४१७३ रन्स केले होते. तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग ही जोडी आहे. ज्यांनी ५८ इनिंगमध्ये ६०.४ च्या रनरेटने ३३८३ रन्स केले आहेत.